Jump to Audio, Video and Credits
Synopsis
RaagaRanch team participated in the BMM Geet Spardha 2015 (Theme song competition) organized by Bruhan Maharashtra Mandal.
The song elaborates on the convention theme - "Maiytra Pidhyanche" - which is a celebration of harmony among the generations of Marathi immigrants in preserving our culture and traditions in this new motherland. More in this synopsis by Asmita. |
एका गाण्याची गोष्ट!
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशन गीत स्पर्धेसाठी गाणं करायचं ठरलं आणि RagaaRanch चा आमचा कंपू एका संध्याकाळी एकत्र जमला. गरम वाफाळता आल्याचा चहा, साबुदाण्याची खिचडी, साथीला भीमसेन जोशींचा मिया मल्हार, अशी शक्य तितकी मराठी वातावरण निर्मिती केल्यामुळे तसेही आम्ही सगळे nostalgic झालो होतो. त्यात ‘मैत्र पिढ्यांचे जपे वारसा, कला संस्कृती मायबोलीचा’, हे अधिवेशनाचं बोधवाक्य वाचलं, आणि आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनात गर्दी झाली ती लहानपणच्या आठवणींची. कुणाला आजीनी जोजवताना गायलेली अंगाई आठवली, तर कुणाला लहानपणी कुठेतरी धडपडून, ढोपर फोडून घरी आल्यावर, आजोबांनी हातावर ठेवलेला खडीसाखरेचा खाऊ! मग त्या न सरणाऱ्या आठवणींची कास धरून, हे बोधवाक्य गीतात बांधणं, सोपंच होऊन गेलं एकदम. परदेशात आपल्या वास्तव्याची मूळं रुजवताना, आपल्या मुलांमध्ये आपण भारतीय संस्कृतीची मूळं रुजवू पाहत असतो. असं म्हणतात की It takes a village to raise a child. इथे महाराष्ट्र मंडळाच्या रूपाने आपलं village साकार होतं. दिवाळीतला फराळ, किल्ला, रांगोळ्या, गणेशोत्सव, मराठी गाणी, कविता किंवा अक्षर ओळख यासारख्या उपक्रमातून नवी पिढी, खरं तर गिरवत असते मराठी संस्कृतीचे धडे. हे उपक्रम राबवणाऱ्या लोकांचा उत्साह बघितला की त्यांच्याबद्दलचा आदर आणि मुलांच्या प्रगतीचे कौतुक याने उर भरून येतो. आमच्या गावात, मुंजीचे महत्व लहानग्यांना पटवून द्यायला, एक वयस्क गृहस्थ स्वतःचा वेळ खर्चून मुलांच्या घरी जातात. त्यांना समजावून, इथलेच दाखले देऊन त्यांची मानसिक तयारी करून घेतात. अशी आणि अश्या सारखी अनेक उदाहरणे बघितली की लक्षात येतं, मुलांच्या सांकृतिक संगोपनात, सख्ख्या कुटुंबाबरोबरच आजूबाजूचे काका, मावशी, आजी, आजोबा यांचाही वाटा असतो. अगदी आनंदाने, पण तितक्याच जबाबदारीने ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष ही धुरा पेलतात. मुलांबरोबर समरसून गप्पा गोष्टी करताना नकळतच विचारांची देवाण घेवाण होते. या परस्परांतील स्नेहात, संवादातच मराठी वारसा जपण्याचे रहस्य लपले आहे, हे या गीतातून लोकांपर्यंत पहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या प्रथा, परंपरा आणि संस्कृती यांची मशाल अखंड तेवत ठेवण्यात आपला उद्देश असतो तो केवळ येणाऱ्या पिढीला त्या प्रकाशाने उजळलेल्या वाटेवर चालता यावे इतकाच. त्यांना ती वाट आपली वाटावी, आणि पुढे जाऊन त्या मशालीचे नेतृत्व आपण त्यांच्या हाती सोपवावे. त्या अर्थाने मंडळाने निवडलेले बोधचिन्ह खरच उद्बोधक आहे. सदर गीतातही ‘एकजुटीच्या मशालीचा’ उल्लेख ह्याच अनुषंगानी आला आहे. भारतीय अभिजात संगीतापासून सुरुवात करून, युवा पिढीला अधिक परिचित असणाऱ्या अशा पाश्च्यात्य संगीताची जोड देऊन, आम्ही या गीताची चाल रचली. तो साज शब्दांवर चढवताना वापरलेला वाद्यवृन्द ही असाच, पूर्व - पश्चिमेचा मेळ साधणारा. एक प्रकारे या अधिवेशनाच्या बोधवाक्याचाच गौरव करत निर्माण झालं हे गाणं. आज, अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात स्वयंसेवक आणि कार्यकर्ते दंग असतील. त्यांना हे गीत आम्ही ऐकवू शकतो आहोत, हा आम्ही आमचा मान समजतो. ज्या साठी ते एवढे श्रम घेत आहेत, त्या कार्यक्रमाच्या मूळ संकल्पनेचे सार्थक झाले आहे, असे जर त्यांना या गाण्यातून वाटले, तर त्यातच आमच्या गाण्याचेही सार्थक झाले असे आम्ही समजू. |
Lyricsक्षणात लाभे अवीट तृप्ती, घडून येता भेटी गाठी |
चला जमूया सखे सोबती, जरा विसावू, सोडू रहाटी फिरवू द्वाही सौहार्दाची, एकजुटीची मशाल हाती || असा अनोखा सोहळा हा, सर्वां निमंत्रण अगत्याचे मिळून सारे लहान मोठे, जोपासूया मैत्र पिढ्यांचे जोपासूया मैत्र पिढ्यांचे, जोपासूया मैत्र पिढ्यांचे || मैत्र पिढ्यांचे जपे वारसा, कलासंस्कृतीचा, मायबोलीचा मैत्र पिढ्यांचे जपे वारसा, महाराष्ट्राच्या यशोगाथेचा ज्ञानसंपदेचा || मैत्र पिढ्यांचे, मना मनातील अंतर विरले, हितगुज जुळले मैत्र पिढ्यांचे, अंगत पंगती रंग चढे, संवाद बहरले मैत्र पिढ्यांचे, निखळ हासत खेळत नकळत जमून गेले मैत्र पिढ्यांचे ।। धृ. ।। जरी झळाळी आमुच्या भाळी, कर्मभूमीची कातळ माती मनात ताजी असती अजूनी, जन्मभूमीची नाती विणुनि वसने आपुलकीची, ऋणानुबंधा अखंड जोडू आपत्तीचे अब्द सारुनी, हृद्य तुषार झरू || मैत्र पिढ्यांचे, कणाकणाने क्षणाक्षणाने आम्ही घडतो मैत्र पिढ्यांचे, अभिनव शिखरे कर्तृत्वाची नेमे चढतो मैत्र पिढ्यांचे, परि न संस्कारांचे आम्ही ऋण विसरतो मैत्र पिढ्यांचे ।। १ ।। उत्सव सारे करू साजरे, श्रद्धेची चढवूया गुढी मूळाक्षरे ही गिरवित घडवू , भविष्यातली युवा पिढी विविधता ही नसे विभाजक, आदर्श असा जगती ठेवू युगायुगांची शिकवण आपुली, सत्या विजयी करू || मैत्र पिढ्यांचे, धुंद होऊनी आम्ही गीत मराठी गातो मैत्र पिढ्यांचे, मायभूमीचा ऐसा जयजयकार करतो मैत्र पिढ्यांचे, मायबोलीचा झेंडा अटकेपार नेतो मैत्र पिढ्यांचे मैत्र पिढ्यांचे (x ३) ।। २ ।। |