सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भरत मुनींनी नाट्यशास्त्र लिहिले आणि त्यापासून भारतातील सगळ्या अभिजात कला विकसित झाल्या.
नावात शास्त्र असल्यामुळे, समजायला जड , क्लिष्ट काहीतरी असेल असं वाटावं तर प्रत्यक्षात मात्र ह्या शास्त्राचा प्रत्येक 'प्रयोग' मनोरंजक आणि काही वेळा spiritual ही असतो. त्याहूनही मजेची गोष्ट म्हणजे, ह्याच प्रयोगांना 'खेळ' म्हणायची सुद्धा पद्धत आहे. नाट्यशास्त्राच्या या एका ग्रंथावर आधारित, आजवर अगणित कला बहरल्या. नृत्य, संगीत, अभिनय यांना फुलायला मिळाले आपले स्वतःचे अवकाश आणि कधी कधी त्यांच्या त्रिवेणी संगमातून उगमास आले अजूनच अनोखे अविष्कार. या विविध पैलूंना आजमावत सादर झालेली ही प्रस्तुती. यात खेळाची चुरस, आणि रंजकता ही आहे, आणि प्रयोगाचे नाविन्य ही. यात नटसम्राटांची हतबलता आहे, हिरकणीचे मनोधैर्य आहे, फुलराणीचा अल्लडपणा आहे आणि लावणीचा अवखळपणा ही. खेळ मांडला चा प्रयोग रसिकांनी उचलून धरला तो या नृत्य, नाटक आणि संगीत मिळून सादर झालेल्या मिलाफाला, आणि त्यांची उत्तरोत्तर दाद मिळत गेली ते कुठल्याही कलाकृतीत प्रत्येक स्वराचे, शब्दाचे , ठेक्याचे स्थान किती नेमके आणि अढळ असते या साक्षात्काराला. उघडून पिंजरा, करूया मुक्त विहरू दे, होऊदे व्यक्त नाट्य, नृत्य, छंद , वृत्त कलांच्या या देवाणघेवाणीतून अविष्कार एक नवा उमलला रसिक जन हो लोभ असावा आपल्यासमोर हा खेळ मांडला.. |
Khel Mandala Audio Credits
Theme Music Concept Asmita Phadke Music Bhushan Naniwadekar Hirkani Povada (Adapted from a traditional composition) Singer Shriram Lele Dholaki Ketan Sahasrabudhe Chorus Asmita Phadke Rashmi Naniwadekar Ketan Sahasrabudhe |